बेंगळूर /प्रतिनिधी
देशात काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र कर्नाटकात कोरोनाचे प्रमाण कमी कमी होत आहे. राज्यात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. बुधवारी राज्यात ३३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून ३१३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६,०७७ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत १२,३०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात १७४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर १७१ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. मंगळवारच्या तूलनेत बुधवारी बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ४,३७९ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.