बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मंगळवारी राज्यात ४३८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार मंगळवारी, राज्यात ३४४ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णलयातून घरी परतले. तर ६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात कोरोना संक्रमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ५,८६० आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १२,२७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मंगळवारी जिल्ह्यात ३०६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बेंगळूरमध्ये सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या ४,०६७ आहे. जिल्ह्यात मंगळवारी १३३ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.