बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. परंतु शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी बाधित रुग्णांच्या संख्येत काहीअंशी वाढ झाली. राज्यात शनिवारी ५३१ नवीन रुग्णांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. यासह राज्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९,४२,०३१ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने जरी केलेल्या बुलेटीननुसार राज्यात ४३४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले, तर तीन कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे ५,९६८ आहेत. तर आतापर्यंत १२,२३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. शनिवारी जिल्ह्यात ३१८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात २१३ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. बेंगळूर शहरी जिल्ह्यात सध्या ३,९३७ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे