बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंगळवारी सांगितले की, सरकार १७ सप्टेंबर रोजी राज्यभरात विशेष कोविड -१९ लसीकरण मोहीम आयोजित करणार आहे, त्या दिवशी राज्यात २५ ते ३० लाख डोस देण्याचे लक्ष्य असणार आहे.
“आम्ही १७ सप्टेंबर रोजी बेंगळूरसह सर्व जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम आयोजित करत आहोत. मी यासंदर्भात जिल्ह्यांच्या डीसींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली आहे. या महिन्यात जास्तीत जास्त लसी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे अशा विशेष मोहिमा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ” असे बोम्माई म्हणाले.
सर्व जिल्ह्यांतील डीसी आणि कोरोना व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंत्री त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमधून या मोहिमेत सामील होतील आणि ते त्या दिवशी गुलबर्गामध्ये असतील, असे ते म्हणाले.