बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. शुक्रवारी राज्यात ४३० नवीन रुग्णांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. तसेच राज्यात शुक्रवारी ४७० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले, तर तीन कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे ५,८७४ आहेत. तर आतापर्यंत १२,२३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. शुक्रवारी २१७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी २२८ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. बेंगळूर शहरी जिल्ह्यात सध्या ३,८३३ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.