बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी राज्यात कोविडची ६४५ नवीन प्रकरणे नोंदली गेली. यासह राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ९,३३,०७७ वर पोहोचली असून यापैकी ९,१३3,०१२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. यापैकी मंगळवारी ८०७ लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात कोविडच्या सक्रिय रूग्णांची संख्या आठ हजारांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ७८६५ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १७२ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १२,१८१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मंगळवारी सहा मृत्यूची पुष्टी झाली आहे.
आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासांत ८,५३२ जलद प्रतिजैविक आणि ८०,९२५ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ८९,४५७ नवीन नमुन्यांची तपासणी केली.