बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांच्या प्रकरणात वाढ होत असताना, कर्नाटक सरकारने मंगळवारी जाहीर केले की कोरोना पोसिझिटिव्ह असलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या उमेदवारांना कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (केसीईटी) २०२० देण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे. ३०आणि ३१ जुलै दरम्यान होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी १.९४ लाखाहून अधिक उमेदवारांनी प्रवेश घेतला आहे.
या वृत्तास दुजोरा देत उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ३० आणि ३१ जुलै रोजी केसीईटी २०२० होईल. सर्व उपायुक्तांना कोरोना गुणधर्म असलेल्या आणि चाचणी घेतलेल्या उमेदवारांसाठी विशेष परीक्षा केंद्र आणि खोल्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या उमेदवार आणि परिवेक्षकांच्या सुरक्षेची हमी देत असल्याचे सांगून कोविड केअर सेंटरमधून पिक-अप आणि सोडण्याच्या सुविधेसाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.