बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये लसीकरणात महिलांचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकरणात सहभाग दिसत आहे. कोवीन अॅप आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की राज्यात आतापर्यंत तब्बल २,८८,७८७ महिलांना लस देण्यात आली असून केवळ १,७४,५४५. पुरुषांना लस देण्यात आली आहे. दरम्यान देशातही ३९,५६,१९८ महिलांना तर २८,९०,६७६ पुरुषांना लस देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेक आरोग्य कर्मचारी जसे आशा, एएनएम, कर्मचारी परिचारिका या महिला आरोग्य सेविका आहेत. यात पुरूषांपेक्षा जास्त स्त्रियांना लसीकरण केले गेले आहे.
राज्यातील कोविड रुग्णांच्या आकडेवारीनुसार महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त संसर्ग झाला आहे. तसेच महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्युदर जास्त आहे.
पहिल्या राज्य सेरोसर्वेमध्ये, सर्वेक्षण केलेल्या १६५८५ व्यक्तींपैकी ३० टक्के पुरुष आणि २२ टक्के महिलांवर सारस-सीओव्ही -२ विषाणूचा धोका असल्याचे दिसून आले.
१० फेब्रुवारी रोजी को-डब्ल्यूएसी डॅशबोर्डवरून प्राप्त झालेल्या लिंगनिहाय माहितीनुसार राज्यात ६,००,१५८ महिलांनी लसीकरणासाठी नोंदणी केल्याचे दिसून आले. यामध्ये पुरुषांच्या संख्येपेक्षा महिलांची संख्या ९६,२५४ ने जास्त आहे.