म्हैसूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने म्हैसूर विद्यापीठ व कर्नाटक मुक्त विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या आवारात दोन कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वैद्यकीय केंद्रांमध्ये केवळ कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे असलेल्या वैद्यकीय रूग्णांवरच उपचार केले जावेत, असे जिल्हा वैद्यकीय अधिकारी अभिराम जी. शंकर यांनी गुरुवारी सांगितले.
प्रस्तावित कोविड केअर सेंटरसाठी म्हैसूर विद्यापीठ व कर्नाटक मुक्त विद्यापीठाला वसतिगृह इमारती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी मंडकल्ली विमानतळ संपर्क रोड येथे कर्नाटक मुक्त विद्यापीठाच्या अॅकॅडमिक ब्लॉकमध्ये 530 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. चामुंडी विहार स्टेडियममध्ये 800 खाटांची क्षमता असणारा सीसीसी देखील स्थापित केला जाईल.
म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जी. हेमंत कुमार यांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाविषयी बोलताना त्यांनी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी खोल्यांना कुलूप लावून त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे इतर पर्यायांवर जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली जात आहे. गौतम वसतिगृहात १२० बेड क्षमतेचे वैद्यकीय केंद्र सुरू करता येईल. त्यामुळे वसतिगृहे साफ करून ती जिल्हा प्रशासनाकडे देण्यास तयार आहेत. असे म्हंटले आहे.
कर्नाटक मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. विद्याशंकर म्हणाले की, कॅम्पस व वसतिगृहाच्या रिक्त जागांवर शैक्षणिक उपक्रम नसल्यामुळे ते जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आपत्ती उद्भवल्यास इमारत घेण्याचा अधिकार आहे. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या वसतिगृहांमध्ये रुग्णांना क्वारंटाईन केलं जाऊ शकत.