बेंगळूर/प्रतिनिधी
शुक्रवारी कर्नाटक विधानपरिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे एमएलसी एम. के. प्रणेश यांची निवड झाली. धर्मेगौडा यांच्या निधनाने विधानपरषद उपाध्यक्ष पद रिक्त होते. दरम्यान प्रणेश यांची उशीरा विधानपरिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
निवडणुकीत प्रणेश यांना जद (एस) एमएलसींनी पाठिंबा दर्शविला होता. अधिवेशनाच्या काळात होणाऱ्या विधानपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला भाजपकडून पाठिंबा मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कॉंग्रेसचे प्रतापचंद्र शेट्टी एमएलसीचे अध्यक्ष आहेत. यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान गेल्या महिन्यात एस.एल. धर्मे गौडा यांच्या निधनानंतर उपसभापतीपदाची निवडणूक झाली.