ऑनलाईन टीम / बंगळूरू :
भारतीय जनता पक्षाकडून आगामी द्विवार्षिक विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवार पर्यंतचा अवधी आहे. परिषदेतील सात सभासद सेवानिवृत्त होत असल्याने पुन्हा निवडणूक घेतली जात आहे. या सात जागांपैकी बीजेपी चार जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काँग्रेसला दोन जागा आणि जेडी (एस)ला एक जागा विधानसभेत मिळतील अशी चर्चा आहे.
विधानसभेमध्ये अध्यक्ष तसेच काँग्रेसचे 68 आणि जेडी(एस) चे 34 सदस्य वगळता सत्ताधारी बीजेपीचे एकूण 116 सदस्य आहेत. भाजप पक्षाकडून नागराज यांना उमेदवारी दिली असून ए.एच. विश्वनाथ यांना वगळण्यात आले आहे. तर दक्षिण कन्नडामधील नायक आणि माजी मंत्री वल्यापूर यांना देखील तिकीट देण्यात आले आहे.
नागराज आणि विश्वनाथ हे बंडखोर काँग्रेसचे नेते असून त्यांनी जून 2019 मध्ये जेडी (एस) काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कर्नाटक विधानसभेचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात असलेल्या बीजेपी सरकारची स्थापना करण्यात मदत देखील केली होती.
त्यावेळी 17 पैकी 16 बंडखोर सदस्य बीजेपीमध्ये सामील झाले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत 15 जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये नागराज आणि विश्वनाथ यांचा समावेश होता. मात्र यावेळी शंकर यांना पुढील निवडणुकीत एमएलसी किंवा मंत्री केले जाईल, असे आश्वासन देऊन विधानसभा पोटनिवडणुकीत सहभाग घेऊ नका असे सांगण्यात आले होते.
दरम्यान, बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये एस. शंकर, नायक, नागराज आणि सुनील वल्यापुरे यांची नावे आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने या सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये अनिवार अहमद, जयम्मा, मॅक वेणुगोपाल, एन एस बोस रज्जू, एचएम रेवन्ना (सर्व कॉंग्रेस) यांचे टीडी शरण आणि ज्येष्ठ डीयू मल्लिकार्जुन यांचा समावेश असून यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार आहे.