बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी भगवान शिव यांच्याशी कोरोना योध्द्यांची तुलना केली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मंगळवारी, डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि रुग्णवाहिका कामगार हे सर्व कोरोना योद्धा आहेत आणि सर्वांनीच त्यांचे कर्तव्य मानले पाहिजे. भगवान शंकरांनी देवता आणि असुरांनी बनविलेल्या समुद्री मंथनातून बाहेर पडलेले विष प्राशन केले होते. त्याचप्रमाणे कोरोना वॉरियर्सही भगवान शंकरांप्रमाणेच इतरांना जीवदान देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.
तसेच मंत्री सुधाकर यांनी बंगळुरू कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर, स्वॅब कलेक्शन सेंटर आणि फीव्हर क्लिनिकमध्ये कार्यरत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ग्रुप डी कर्मचार्यांना पुढील सहा महिन्यांच्या पगारासह 10,000 रुपये पगार भत्ताही मिळेल. असे जाहीर केले आहे.