बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा (केएआरटीईटी) अधिसूचना केंद्रीयकृत प्रवेश कक्षाने (सीएसी) जाहीर केली आहे. २२ ऑगस्ट २०१ रोजी ही परीक्षा होणार आहे. अर्ज भरायचा झाल्यास इच्छुक उमेदवार २० जुलैपूर्वी अधिकृत वेबसाइट, schooleducation.kar.nic.in. या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
केएआरटीईटी चाचणी १५० गुणांची असेल. यासाठी बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. कोणतीही नकारात्मक गुणांकन असणार नाही. दोन पेपर घेण्यात येणार आहे. परीक्षार्थींनी पहिला पेपर क्लिअर केल्यास ते इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्र असतील आणि जे पेपर २ ला पात्र ठरतील ते इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्र असतील.
पास होण्यासाठी उमेदवारांना ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. केआरईटीईटी पात्रता प्रमाणपत्राचा वैधता कालावधी निकाल जाहीर झाल्यापासून सात वर्षांचा असेल. केआरईटीईटी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एखादी व्यक्ती किती प्रयत्न करू शकते यावर कोणतेही बंधन नाही.