बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरसह कर्नाटकातील खासगी रुग्णालयांमधील रूग्णबाह्य विभाग (ओपीडी) शुक्रवारी ११ डिसेंबर रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. आयुर्वेदात पदव्युत्तर पदवीधरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याच्या केंद्राच्या अलीकडील निर्णयाच्या विरोधात राज्यातील अॅलोपॅथी वैद्यकीय चिकित्सकांनी हा बंदचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान माध्यमांशी बोलताना खासगी रुग्णालये व नर्सिंग होम असोसिएशनचे (पीएचएएनए) अध्यक्ष प्रसन्न एच. एम. यांनी राज्यात ओपीडी बंद करण्याचे आवाहन हे मेडिकल असोसिएशनने सुरू केलेल्या देशव्यापी निषेधाचा एक भाग आहे.
अलीकडील राजपत्रातील अधिसूचनेनुसार एमएस आयुर्वेद पदवीधरांना अॅलोपॅथी विज्ञानात विकसित आणि शिकवलेल्या बर्याच शस्त्रक्रिया करण्यास परवानगी आहे. यामुळे जनतेला धोका निर्माण होतो, असे ते म्हणाले.