बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बोम्माई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शपथविधीनंतर दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी जाणार होते. अशी माहिती माजी मंत्री आर. अशोक यांनी दिली होती. पण मुख्यमंत्री बसरावज बोम्माई आज दिलेल्या माहितीनुसार ते शुक्रवारी ते दिल्ली येथे हाय कमांड आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहराज्यमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी उद्या (शुक्रवारी) दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेईन. त्यानंतर दोन-तीन दिवसांत मी त्यांना भेटून पुन्हा परत येईन. आम्ही मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा करू आणि त्यानंतर मंत्रिमंडळ निश्चित केले जाईल, असे त्यांनी हुबळी येथे सांगितले.