बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकात शुक्रवारी कोरोनाचे ३८६ नवीन रुग्ण सापडले. तर २९१ रुग्णांना कोरोनावर मत करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. शुक्रवारी कोरोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ९,४७,२४६ वर पोहोचली आहे. यापैकी ९,२९,०५८ लोक बरे झाले आहेत. राज्यात सध्या ५,८८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२५ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत १२,२८७ रूग्णांचा बळी गेला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी २०९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यासह जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,०३,२३६ वर पोहोचली आहे. तर यापैकी ३,९४,५८३ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४,४४५ रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. जिल्ह्यात सध्या ४,२०७ सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासात ३,९७३ जलद प्रतिजैविक आणि ५७,४६७ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ६१,४४० नमुन्यांची तपासणी केली.