बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य रयत संघ आणि ऐक्य होराटा समितीने २८ सप्टेंबर रोजी शेती विधेयकाच्या निषेधार्थ कर्नाटक बंदची हाक दिली आहे.
कर्नाटक सरकारने एपीएमसी कायदा व जमीन सुधार अधिनियमात दुरुस्ती करण्याचे विधेयक केंद्र सरकारने संसदेत मंजूर केले आहे. शेतकरीविरोधी विधेयकेविरोधात सोमवारपासून बेंगळूर येथे त्यांनी धरणे आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांनी आता कर्नाटक बंदचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी विरोधी विधेयकाच्या निषेधार्थ सोमवारी (२८ सप्टेंबर) राज्यभरात संपूर्ण बंद पाळला जाईल. कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेकर यांनी सुमारे ३० संघटनांनी आमच्या बंदला पाठिंबा दिला आहे, असे सांगितले.
बेंगळूरमधील दलित संघटना, कामगार संघटना, खासगी टॅक्सी मालकांची संघटना, लॉरी मालक संघटना आणि ऑटो संघटनांनी या बंद पाठिंबा दर्शविला आहे. २८ सप्टेंबर रोजी ट्रक, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या कामकाजावरही परिणाम होऊ शकतो, कारण संबंधित संघटनांनी शेतकरी संघटनेच्या संप पुकारल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे प्रवाशांची थोडी गैरसोय होणार आहे.