बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार १३ जानेवारी रोजी होईल असे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी म्हंटले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी संक्रांतीच्या उत्सवापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हंटले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी रविवारी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याचबरोबर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली. यावेळी येडियुरप्पा यांनी राज्यातील राजकारणाबरोबरच मंत्रिमंडळ राज्य विस्ताराबाबत चर्च केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली होती.
मुख्यमंत्री दिल्लीहून बंगळूरला परतल्यानंतर सोमवारी नावे निश्चित होतील असे म्हंटले होते. तसेच सुमारे सहा ते सात मंत्र्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाईल. सोमवारी यादी अंतिम होईल, असे ते म्हणाले. तसेच शपथविधीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित रहावे अशी आमची इच्छा आहे. येडियुरप्पा यांनी नावाबाबत काही मतभेद आहेत जे सायंकाळपर्यंत सोडवले जातील.
रविवारी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रभारी प्रदेश सरचिटणीस अरुण सिंह यांच्यासमवेत दिल्लीत एक तास चर्चा केली.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे, परंतु विलंबामुळे काही नेत्यांमध्ये असंतोषही वाढत आहे. मंत्रीपदी मुनेश कट्टी, मुनिरत्न, बासणगौडा पाटील यत्नाळ, अरविंद यांच्यासह अनेक नेत्यांची नवे चर्चेत आहेत.