बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षा जाहीर झाल्या आहेत. दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने गुरुवारी १४ जून ते २५ जून २०२१ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या एसएसएलसी (दहावी) परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले.
माध्यमांशी संवाद साधताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या वेळेत आक्षेप नोंदवायचे असतील ते कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या परीक्षा संचालकांना २६ फेब्रुवारीपर्यंत पाठवू शकतात, असे मंत्री म्हणाले.
तात्पुरते जाहीर केलेलं वेळापत्रक असं.. पहिला पेपर १४ जूनला भाषा, त्यानंतर १६ जून रोजी गणित, १८ जूनला इंग्रजी किंवा द्वितीय भाषा, २१ जून रोजी विज्ञान, २३ जूनला तृतीय भाषा आणि सामाजिक २५ जून रोजी विज्ञान. असे असणार आहे.