बेळगाव / प्रतिनिधी
ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने मंगळवारी नवीन वर्ष 2022 साजरे करण्यावर निर्बंध जाहीर केले. तथापि, चर्चमधील ख्रिसमस साजरे आणि प्रार्थना सभांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधा येथे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कोविड तज्ज्ञांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी माध्यमांना सांगितले की ३० डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत हे निर्बंध लागू असतील. “नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एमजी रोड, ब्रिगेड रोडवरील सर्व सार्वजनिक मेळाव्यांवर संपूर्ण कर्नाटकात बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या कोणत्याही भागात कोणतेही सार्वजनिक उत्सव आणि विशेष कार्यक्रम होणार नाहीत,” असे बोम्माई म्हणाले.