बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यासह राजधानीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. तवाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने बुधवारी बेंगळूरमध्ये तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याची माहिती दिली.
“गेल्या दहा दिवसांत कोविड प्रकरणांमध्ये (कर्नाटकात) वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १५ मार्चपर्यंत सकारात्मकतेचे प्रमाणही १.६५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. बेंगळूरमध्ये आधीच तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे येडियुरप्पा म्हणाले.
सुमारे ३५०० केंद्रांवर लसीकरण संख्या वाढविण्यावरही राज्य भर देत आहे. “आम्ही दररोज सुमारे ३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची योजना आखली आहे.”