बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकार महिला कोविड योद्ध्यांना प्रत्येकी दोन साड्या वाटप करणार आहे. कर्नाटकचे हातमाग आणि वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी विभागाच्यावतीने सहा लाख साड्या खरेदी करून महिला कोरोना वॉरियर्सना त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
“लॉकडाऊनमध्ये वस्तू विकू न शकल्यामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील विणकरांकडून साडी खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या साड्या अंगणवाडी सेविका, आशा कामगार आणि महिला कोविड १९ वॉरियर्सना वाटल्या जातील, असे मंत्री ”श्रीमंत पाटील यांनी म्हंटले आहे.