बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासताना पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागणार असलेल्या बेंगळुरूमधील दोन घटनांनंतर कर्नाटक सरकारने मंगळवारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्याची योजना जाहीर केली.
अधिकाऱ्यांना राज्यातील सर्व रुग्णालयांना द्रव ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन लिक्विड ऑक्सिजन संयंत्र स्थापन करण्यासाठीही उपाययोजना केल्या जातील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर यांनी सांगितले आहे.