बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचा वेग दररोज वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्णवाढीची संख्या दहा हजारांपर्यंत जात आहे. शुक्रवारी सलग तिसर्या दिवशी राज्यात दहा हजाराहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळले. गुरुवारी राज्यात १०,७०४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. तर शुक्रवारी पुन्हा राज्यात १०,९१३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान राजधानी बेंगळूरमध्येही पुन्हा शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या संख्या पाच हजारांच्या पुढे गेली. बेंगळूर शहरात ५,००९ नवीन कोरोना रुग्णची भर पडली आहे. दुसरीकडे, शुक्रवारी घरी परतणार्यारुग्णांची संख्या ९,०९१ होती.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,१८,८९१ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी राज्यात ११४ जणांचा मृत्यू झाला आहे.