बेंगळूर/प्रतिनिधी
गौरी-गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यासाठी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. सरकारने शिथिल दिली असली तरी राज्य सरकारच्या निर्णयाचे पालन करावे लागणार आहे. यासंदर्भात ब्रुहत बेंगळूर महानगर पालीकेने (बीबीएमपी) प्रति वॉर्डात केवळ एकच गणेशमूर्ती ठेवण्यास परवानगी दिली आहे.
बीबीएमपी कमिशनर एन. मंजुनाथ प्रसाद यांनी बुधवारी जाहीर केलेल्या निकषानुसार मूर्ती केवळ सार्वजनिक ठिकाणी, नियुक्त ठिकाणी केवळ तीन दिवस ठेवता येईल. यासाठी सामाजिक अंतर सुनिश्चित करावे लागेल आणि सर्व भाविकांनी मास्क घालावा लागेल, असेही ते म्हणाले.
विभागीय सहआयुक्त व पोलीस उपायुक्त यांना प्रस्ताव सादर केल्यावर प्रभागात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय त्यांच्याद्वारे घेण्यात येईल, असे आयुक्त प्रसाद यांनी म्हंटले आहे.