बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने प्रस्तावित केलेल्या भू-विधेयक आणि केंद्राने मंजूर केलेल्या नवीन शेती विधेयका विरुद्ध शेकडो शेतकरी, मजूर आणि दलित संघटनांच्या सदस्यांनी सोमवारी निदर्शने सुरु केली आहेत. बेंगळूरच्या आनंदराव सर्कल येथे या निदर्शनाला सुरुवात झाली . त्यानंतर आंदोलनकर्ते फ्रीडम पार्क येथे गेले, तेथे या विषयांवर परिषद घेण्यात आली.
मंगळवारी बेंगळुरू येथे शेतकरी, मजूर आणि दलित संघटनांच्या सदस्यांनी संयुक्त निषेध सुरू ठेवलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच डी. रेवण्णा यांनी फ्रीडम पार्कला भेट दिली.
दरम्यान, विधान सौध येथे विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे, आंदोलनकर्त्यांनी अधिवेशनात लँडलेस कुटुंबांना आणि घर नसलेल्या कुटुंबांना भेडसावणाऱ्या अडचणींवर लक्ष केंद्रित करावे. भू-सुधार अध्यादेशामुळे ही समस्या आणखीनच बिकट होईल, असे निषेध करणार्या संघटनांच्या समूहाच्या एका निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन मंजूर केलेल्या विधयकांमध्ये दुरुस्थी व्हावी अथवा ती रद्द करवीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे.