बेंगळूर/प्रतिनिधी
कोडवा लोक आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल मला खूप आदर आहे असे सांगत कोडवांनी गोमांस खाल्ल्याबद्दलच्या कटू वक्तव्याबद्दल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी दिलगिरी व्यक्त केली. सिद्धरामय्या यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचेही म्हंटले. तरी मी भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले.
सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून कोडगू जिल्हा उपायुक्त कार्यालयासमोर कोडवा संघटनांनी निदर्शने केली. मी असं बोललो नव्हतो. मी म्हणालो होतो की अन्नाची सवय लोकांनुसार बदलू शकते आणि त्यांना आवडेल ते खातात. मी असे आधी म्हटले नाही असे मी आधीच ट्विट करून स्पष्ट केले आहे. मला कोडवा लोकांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा खूप आदर आहे. माझ्या वक्तव्यांमुळे जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सिद्धरामय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले.