बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने केसीईटी घेण्यास अनुमती दिली आहे. ३० आणि ३१ ला ही परीक्षे होणार आहे. यासाठी बाहेरील राज्यातील विद्यार्थीही परीक्षेसाठी येणार आहेत. केरळ सरकारने बुधवारी परीक्षा संपल्यानंतर कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (केसीईटी) मधील उमेदवार आणि कुटूंबांना होम क्वारंटीन करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलै रोजी परीक्षा झाल्यांनतर , उमेदवार आणि कुटुंबे सात दिवस स्वतःला अलग ठेवणे आवश्यक आहे. पाचव्या दिवशी त्यांच्यावर अँटीजन चाचण्याही केल्या जातील, अशी माहिती कासारगोडचे जिल्हाधिकारी डी. साजिद बाबू यांनी याविषयी माहिती दिली आहे.
जिल्हाधिकारी डी. साजिद बाबू यांनी केरळ सरकार ३० आणि ३१ जुलै रोजी कासारगोड येथील थलप्पाडी चेकपोस्टवर उमेदवारांना नेईल. त्यांनतर कर्नाटक सरकार विद्यार्थ्यांना चेकपोस्टवरून त्यांच्या परीक्षा केंद्रांवर नेईल, मात्र उमेदवारांनी त्याकरिता इतर कोणत्याही प्रकारची वाहतुकीची पद्धत वापरु नये, असेही ते म्हणाले आहेत.