बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटक काँग्रेस नेत्यांनी बीजेपी सरकारवर कोरोना संरक्षण उपकरणे खरेदीत गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी वारंवार असा आरोप केला आहे. पण उपमुख्यमंत्री डॉ.सी.एन. अश्वथनारायण यांनी सिद्धरामय्या यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावत, राज्य सरकार कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हंटले आहे. मंत्री श्रीरामुलू यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार वार्तामध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के सुधाकर, उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वनाथनारायण यांनी मार्चमध्ये देशात कोठेही वैयक्तिक संरक्षण उपकरणांची (पीपीई) उत्पादन न झाल्यामुळे चीनमधून ३ लाख पीपीई किट विकत घेण्यात आले होते.
याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. देशात पीपीईचे उत्पादन सुरू झाल्यानंतर१ लाख ५० हजार पीपीई किट ३३० रुपयांच्या किंमतीवर खरेदी करण्यात आले आहेत. असे असूनही सिद्धरामय्या यांनी २१०० रुपये देऊन चीनकडून पीपीई खरेदी केल्याचा खोटा आरोप केला आहे. चीनचे पीपीई किट अद्याप फ्लिपकार्टवर ३९०० रुपयांना विकले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी गृह, आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बाल विकास, सार्वजनिक शिक्षण, समाज कल्याण, नगरपालिका प्रशासन विभागासह विविध विभागांकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २ हजार ११८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते यांनी ४ हजार१६१ कोटी खर्च केल्याचा आरोप निराधार आहे. १ हजार व्हेंटिलेटर खरेदी केल्याचा आरोप कॉंग्रेस नेते करीत आहेत पण आतापर्यंत केवळ २४८ व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के सुधाकर यांनी आम्ही या प्रकरणात कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत. भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप करून कॉंग्रेस नेते अधिकाऱ्यांचा अपमान करीत आहेत. जनता हे सर्व पहात आहे. एक जबाबदार प्रतिस्पर्ध्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी कॉंग्रेस नेते अशा असमान परिस्थितीत क्षुल्लक राजकारणात व्यस्त असल्याचे ते म्हणाले.