बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दररोज कोरोना बाधित लोकांची संख्या कमी होत चालली आहे. सोमवारी राज्यात २,५७६ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४४,८०५ इतकी आहे. नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यातील विविध जिल्ह्यात ८,३३४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. तर राज्यात सोमवारी एकूण २९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूरमध्ये सोमवारी १,४३९ कोरोना संक्रमित रुग्ण सापडले. बेंगळूर शहरी जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या २६,०९८ आहे. बेंगळूर जिल्ह्यात सोमवारी ५,९२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी बेंगळूरमध्ये १४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे ३,८८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ११,२२१ जणांचा मृत्यू झाला आहे.