बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी जाहीर केले की उमेश कट्टी, अरविंद लिंबावळी, मुरुगेश निरानी, एस अंगारा, विधानपरिषद सदस्य एम. टी. बी. नागराज, सी. पी. योगेश्वर आणि आर. शंकर हे आज मंत्रीपदाची शपथ घेतील.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आम्ही राज्यपालांना सात नावांची यादी पाठविली आहे. ते आज मंत्री पदाची शपथ घेतील असे म्हंटले आहे.
आत्तापर्यंत केवळ सात मंत्रीपदे उपलब्ध असताना मंत्रिमंडळातील आणखी एक पदे रिक्त होणार आहे. कारण उत्पादन शुल्क मंत्री एच नागेश बुधवारी किंवा गुरुवारी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देतील. मुख्यमंत्री कार्यालयाच्या मते, नवे मंत्री बुधवारी मकर संक्रांती उत्सवाच्या आधी राजभवनात शपथ घेतील.