बेंगळूर/प्रतिनिधी
विधानसभेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात विरोधी पक्ष काँग्रेसने घोषणाबाजी घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एक देश, एक निवडणूक याविषयावर चर्चा करण्यात आली. पण काँग्रेसने या एक देश, एक निवडणुकीला विरोध केला.
दरम्यान कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात देशातील लोकशाही संपविण्याच्या आरएसएसच्या षडयंत्राला ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या चर्चेला विरोध केला. कॉंग्रेसच्या आमदारांनी भाजप आणि आरएसएसवर कडक टीका करत घोषणाबाजी केल्यावर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कॉंग्रेसला आरएसएसविरोधात बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हंटले.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हो आम्ही आरएसएस आहोत. पंतप्रधानसुद्धा आरएसएसचे आहेत. तुम्हाला आरएसएसबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का?” असा सवाल त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसला केला. सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनीही विरोधी पक्ष आरएसएसचे नाव का ओढत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.