बेंगळूर/प्रतिनिधी
देशभरता १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. दरम्यान कर्नाटकच्या आरोग्य विभागाने राज्यभरातील आरोग्य केंद्रांना सूचना दिल्या आहेत की कोविशील्डची दिली जाणारी लस प्रथम आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असतील, असे म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होईपर्यंत लसीकरण रोलआऊट सुरू न करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने बुधवारी जारी केल्या. लसीकरण मोहिमेची कार्यक्षम अंमलबजावणी व्हावी यासाठी विभागाकडून संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे.
शनिवारी या मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी कर्मचार्यांसह सुमारे १६ लाख लोकांना लसीचे डोस मिळाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.