प्रतिनिधी/बेंगळूर
कर्नाटकमध्ये मंगळवारी ८,१९१ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर राज्यात ८७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ७,२६,१०६ वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या १०,१२३ झाली आहे.
राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे मंगळवारी १०,४२१ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ६ लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १ ऑक्टोबरपासून राज्यात १.१७ लाखाहून अधिक लोक बरे झाले आहेत. तर १ सप्टेंबरपासून आतापर्यंत एकूण ३,४७,८७९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.