बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील चिक्कमंगळूर, हसन, कोडगू आणि शिवमोगा जिल्ह्यात गुरुवारी (७ जानेवारी) यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. गुरुवारी या चार जिल्ह्यात दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या भागात गुरुवारी ६४.५ मिलिमीटर ते ११५.५ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने नमूद केले आहे. दरम्यान, त्यात ९ जानेवारीपर्यंत राज्यातील बहुतेक भागात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील किनारपट्टी व उत्तर भागात सामान्य थंडीचे दिवस व रात्री थोड्या थोड्या वेळाने अधिक थंडीचा अनुभव येईल, “अशी शक्यता वर्तविली आहे.