ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आजपासून (दि.11) सरकारी आणि खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाने वेग घेतला असून, आजपासून सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लसीकरण सुरू होत आहे. लसीसाठी पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही दिली जाईल. कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी कामाच्या ठिकाणी लसीकरण ही सुविधा प्रभावी ठरेल. एकावेळी कार्यालयातील केवळ 100 कर्मचाऱ्यांनाच ही लस दिली जाईल, असेही आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.