प्रतिनिधी / सांगली
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना 133 व्या जयंतीनिमित्त सांगलीत अभिवादन करण्यात आले. कर्मवीर चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपक्रमांना फाटा देत साध्या पद्धतीने कर्मवीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय कार्यालयाच्यावतीने विभागीय अधिकारी के. बी. मालुसरे, शेटे सर, नंदकुमार सूर्यवंशी, धनंजय कन्हेर माळी सर आदींनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलच्यावतीने स्कूल कमिटी सदस्य यशवंत यादव सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, हुसेन मगदूम, नागणे एन. ए, आदींनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.