प्रतिनिधी / सांगली
रयत शिक्षण संस्थेच्या संजयनगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. संजय निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली नववर्षाच्या स्वागत आकाश दर्शनाचा मनमुराद आनंद लुटून केले. निरभ्र आकाश समजावून घेतले.
शुक्रवारी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मुलांच्या चिकिस्तक, जिज्ञासु, सहसी वृत्तीला वाव मिळावा व पुस्तका पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिथुन राशीतील उल्कावर्षाव आणि आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे दुर्बिणीतून दर्शन घेतले. मुलांनी रात्री चंद्र, नक्षत्र, कृतिकेचा तारकापुंज,आदि ग्रहतारे समजावून घेतले. सोबतच विश्वाची निर्मिती,रचना, जीवसृष्टी आदी माहिती डॉ. निटवे यांनी दिली. यामुळे नेहमीचे ग्रहतारे मुलांना आज ओळखीचे वाटू लागले. या मुलांना शशिकांत सुतार, संजय गलगले यांनी ग्रहतारे यांची माहिती सांगितली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता, जिज्ञासा वृत्ती वाढेल असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांनी व्यक्त केले. संयोजन विज्ञान विभाग प्रमुख हुसेन मगदूम यांनी केले. यावेळी शिक्षिका कीर्ती सोहनी, तसेच धुळा इरकर, ज्योती नागने व विद्यार्थी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम राबवण्यात आला.