स्वयंपूर्ण मित्र सगुण वेळीप यांची भेट, जाणून घेतल्या समस्या
प्रतिनिधी /सांगे
‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या महत्त्वपूर्ण धोरणाच्या अंतर्गत राज्य सरकारने कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांची सांगे तालुक्मयातील कावरेपिर्ला ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नुकतीच कावरेपिर्ला पंचायत क्षेत्रातील अतिशय दुर्गम आणि डोंगरमाथ्यावरील कर्ला गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक गावकऱयांशी संवाद साधून येथील रस्ता, पिण्याचे पाणी, शिक्षण, नेटवर्कच्या समस्या जाणून घेतल्या.
केपे-सांगे तालुक्मयांच्या सीमेवरील डोंगराळ भागात असलेल्या तिसकोण-काजुगोठो या गावांदरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. उन्हाळय़ाच्या दिवसांत कर्ला गावाला पाण्याची समस्या भेडसावते. यावर स्थानिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, डोंगराळ भागात पाण्याचा साठा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचे नियोजन नसल्याने ते पाणी वाया जाते. या नैसर्गिक पाण्याचे जतन आणि योग्य वापर करण्यासाठी गावकऱयांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून उन्हाळय़ात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. या पाण्याचा पुरेपूर वापर केल्यास गावकऱयांना भाजी लागवड मोठय़ा प्रमाणात करणे शक्मय होईल आणि यातून गावाला स्वयंपूर्ण होण्याची संधी मिळेल. याकामी सरकारच्या विविध खात्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, असे वेळीप यांनी सांगितले.
आदिवासी कल्याण खाते, कृषी खाते, कला व संस्कृती खात्यांतील विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच किसान कार्ड, किसान पेडिट कार्ड यांचे महत्त्व सांगितले. 60 वर्षांवरील लोककलाकार, ज्ये÷ नागरिक यांना सरकारचे मानधन मिळते की नाही हेही जाणून घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत पंच तोळयो गावकर, माहिती तंत्रज्ञान खात्याचे अधिकारी प्रदीप गावकर, पायक गावकर संजय गावकर, सूर्याजी गावकर गुरुदास गावकर उपस्थित होते.