मनपा आयुक्तांनी घेतली बैठक : डिसेंबरअखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मालमत्ताधारकांकडून शंभर टक्के घरपट्टी जमा करण्यासह कर चुकविणाऱयांचा शोध घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त आणि महसूल उपायुक्तांनी महसूल अधिकाऱयांना बजाविला. सर्वेक्षण करून येत्या पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना केली. तसेच डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे टार्गेट महसूल विभागाच्या अधिकाऱयांना देण्यात आले.
मनपाच्या उत्पन्नात घट झाली असून महसूल गळती रोखण्यासाठी मनपा आयुक्तांनी पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने मंगळवारी सायंकाळी उशिरा महसूल विभागाची बैठक घेऊन विविध सूचना केल्या. शहरात 7 लाखांहून अधिक विजेचे मीटर आहेत. त्यानुसार मालमत्तांची संख्यादेखील अधिक असल्याचा दावा महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी केला आहे. तसेच सदर सर्वेक्षणानुसार मालमत्तांची संख्या 2 लाखांहून अधिक असण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कर चुकविणाऱया मालमत्ताधारकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून घरपट्टी वसूल करा, अशी सूचना आयुक्तांनी मनपाच्या महसूल अधिकाऱयांना केली.
2021-22 या आर्थिक वर्षात 50 कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. पण यापैकी आतापर्यंत 65 टक्क्मयांहून अधिक घरपट्टी वसूल झाली. उर्वरित 35 टक्के घरपट्टी वसुलीसाठी आतापासून प्रयत्न करण्याची सूचना आयुक्तांनी केली. डिसेंबरअखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आदेश बजाविला. महसूल वसुलीसाठी तसेच कर चुकविणाऱया मालमत्ताधारकांचा शोध घेण्यासाठी महसूल निरीक्षकांना धावपळ करावी लागणार आहे. तसेच मालमत्ताधारकांचा शोध घेऊन घरपट्टी उद्दिष्ट शंभर कोटी करण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार बुधवारी महसूल उपायुक्तांनी पुन्हा महसूल विभागाची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पंधरा दिवसांत टॅक्स चुकविणाऱया मालमत्ताधारकांचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याची सूचना केली. शहरात अनधिकृत मालमत्ताधारकांची संख्या भरपूर असून अनधिकृत मालमत्तांना कर बसवू नये, अशी सूचना महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांनी केली. यावेळी महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर व महसूल निरीक्षक उपस्थित होते.