मे-जूनमध्ये विक्री घसरली: राज्यांच्या उत्पन्न वाढीत योगदान, 50 टक्केपेक्षा जास्त कर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विविध राज्यांमध्ये कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. परंतु काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर विविध व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याचे पहावयास मिळाले. परंतु याच दरम्यान मद्यावर 50 टक्क्मयांपेक्षा अधिकचा उपकर आकारण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून मे आणि जून महिन्यात मद्य विक्री 59 टक्क्मयांनी कमी झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिल्ली, आंध्र प्रदेश, ओडिसा, जम्मू काश्मीर आणि पुदुचेरी यासारख्या राज्यात मद्यावर 50 टक्क्मयांहून अधिकची कर आकारणी केल्याची माहिती मद्य उद्योग संघटना इंडियन अल्कोहल बेव्हरेज कंपनीज(सीआयईएबीसी) यांनी दिली आहे. या कारणामुळे सदर राज्यांमध्ये मद्यविक्री मे महिन्यात 66 टक्के आणि जूनमध्ये 51 टक्क्मयांनी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेश, मेघालय, राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ आणि झारखंड आदी राज्यांमध्ये मद्यावर 15 ते 50 टक्क्मयांपर्यंत उपकर आकारला होता. त्यामुळे या राज्यांमध्ये विक्री 34 टक्के घसरली आहे. तसेच ज्या राज्यात कर शुल्क 15 टक्के आकारले होते, त्या ठिकाणी मात्र विक्री 16 टक्क्मयांनी प्रभावीत झाल्याची नोंद केली आहे.
25 ते 15 टक्क्मयांपर्यतची घसरण
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगढ, हरियाणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, आसाम, चंदीगढ, मध्य प्रदेश, गोवा आणि पंजाब आदी राज्यात मे आणि जूनमधील मद्य विक्री वर्षाच्या आधारे 25 ते 15 टक्क्मयापर्यंत घसरली आहे.
चालू वित्त वर्षात उत्पन्न घसरले
मद्य उद्योग राज्य सरकारांच्या उत्पन्नात जळपास 2.5 लाख कोटांचे योगदान देत आहे. चालू वित्त वर्षामध्ये हे उत्पन्न 25 ते 30 टक्क्मयांनी घसरले असल्याची माहिती सीआयईएबीसीचे महासंचालक विनोद गिरी यांनी दिली आहे.