येळ्ळूर येथील बाल शिवसेना युवक मंडळाने केली मदत
प्रतिनिधी /येळ्ळूर
वादळी पावसामुळे येळ्ळूर येथील हट्टीकर कॉलनीजवळील विद्युत खांब कलंडले होते. ते खांब नव्याने उभे करण्यासाठी हेस्कॉमच्या कर्मचाऱयांना बाल शिवसेना युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. सर्वांनी मिळून ते खांब पुन्हा उभे केले. यामुळे या परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
वारा व पावसामुळे विद्युत खांब बऱयाच वेळा कलंडतात. हेस्कॉममध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांची संख्या फारच कमी आहे. येळ्ळूर परिसरात वारंवार खांब कलंडणे तसेच विद्युत पुरवठा खंडित होणे हे प्रकार सुरू झाले आहेत. येळ्ळूरचे वायरमन यल्लाप्पा गौंडाडकर आणि मोहन बुरुडकर हे रात्रंदिवस काम करत आहेत. या दोघा कर्मचाऱयांवर मोठा ताण पडत आहे. रात्रीच्या वेळीही ते काम करत आहेत. कोणतेही काम करायचे झाल्यास हेस्कॉमकडून कर्मचाऱयांचा अधिक पुरवठा होत नाही. तरीदेखील मोठी कसरत करत हे दोन्ही लाईनमन येळ्ळूर विभागावर लक्ष ठेवून आहेत. गोडय़ा विहिरीजवळील हट्टी कॉलनी येथे असलेले विद्युत खांब कलंडले होते. या दोघा कर्मचाऱयांना ते व्यवस्थित करणे कठीण होते. त्यामुळे कलमेश्वर गल्ली येथील बाल शिवसेना युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, चांगदेश कुगजी, परशराम कदम, मारुती हट्टीकर, अनिल धामणेकर, महेश हट्टीकर, शिवाजी मानकोजी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.