आमदार दीपक केसरकर आणि संजू विर्नोडकर टीमचा पुढाकार
सावंतवाडी / प्रतिनिधी:
शासन धोरणानुसार कोरोना मुक्त गावातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर कलंबिस्त इंग्लिश स्कूल हायस्कूलच्या नवीन व जुन्या इमारती, वर्गखोल्या, प्रयोग शाळा, स्टाफ रूम, संगणक विभाग, स्वच्छतागृहे, परिसर व लगतची दुकाने, पोस्ट ऑफिस व परिसर संजू विर्नोडकर टीमच्या वतीने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आला.
या कार्यात तुषार बांदेकर, संतोष तळवणेकर, शिक्षक पीटी पावरा, शिक्षकेतर कर्मचारी महेश कलंबिस्तकर, संजय पालकर सहभागी झाले. पालकांच्या वतीने संजय पालकर यांनी पुढाकार घेतला. सदर शाळेत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आल्याने या भागात निर्जंतुकीकरण हे करणे अत्यंत गरजेचे होते.
कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रवी जाधव, सहा. शिक्षक पी. टी. पारवा पालकांच्या वतीने संजय पालकर व ग्रामस्थानी आ. दीपक केसरकर आणि संजू विर्नोडकर टीमचे आभार मानले.