सावंतवाडी / प्रतिनिधी:
अवैध दारू धंद्यांवर धडक कारवाई आता हाती घेण्यात आली आहे सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त मळा येथे एका दुकान गाळ्यात साडेसात लाख रुपये किमतीची अवैद्य दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या हाती लागली आहे याप्रकरणी दारू सप्लाय करणारा व दारू विक्री व्यवसाय करणाऱ्या अशा एका पुरुष व एका महिलेवर कारवाई करण्यात आली आहे कलंबिस्त पंचक्रोशीतील आतापर्यंतचे ही सर्वात मोठी कारवाई आहे .
पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री. राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उप निरीक्षक श्री. सचिन शेळके, पोलीस अंमलदार सुधीर सावंत, प्रकाश कदम, अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, प्रमोद काळसेकर, प्रथमेश गावडे, ज्ञानेश्वर कांदळगावकर यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत मौजे कलंबिस्त मळा येथें आज रात्री 20.45 वाजता आरोपीत महिला फातिमा लॉरेन्स फर्नाडिस वय वर्षे 45 राहणार कलंबिस्त हिचे ताब्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गोवा बनावटीच्या दारुचे 7, 52, 450 रुपये किंमतीचे 134 बॉक्स मिळून आला. सदरचा मुद्देमाल हा आरोपी प्रकाश पाटील रा. सावंतवाडी याने उपलब्ध करून दिला असल्याने दोन्ही आरोपिंचे विरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलंबिस्त मळा येथे दुकान गाळे आहे. कृषी सेवा केंद्राच्या मागे एका कोपऱ्यात खोलीत दारू ठेवण्यात आली होती सदर गाळा हा भाड्याला देण्यात आला आहे गाळे मालक मुंबई येथे राहत आहे दारू स्टॉक करणे व सप्लाय करणे असे दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत अधिक तपास पोलीस करत आहेत