एक किलो चांदीचा मुखवटा पळविला
प्रतिनिधी/ बेळगाव
कलखांब, ता. बेळगाव येथील ब्रह्मलिंग मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. यासंबंधी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मंदिराचे पुजारी मारुती रेवणसिद्ध पुजारी, राहणार कणबर्गी यांनी फिर्याद दिली आहे. घटस्थापनेनिमित्त 18 ऑक्टोबर रोजी ब्रह्मलिंग देवाला चांदीचा मुखवटा घालण्यात आला होता. दसऱयानंतर हा मुखवटा काढला जातो. 23 ऑक्टोबर रोजी रात्री दर्शनी दरवाजा बंद करून पुजारी गाभाऱयासमोर झोपले होते.
दि. 24 च्या पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला. बंद दरवाजा ढकलून चोरटय़ांनी गाभाऱयाला लावलेले कुलूप फोडले आहे. गाभाऱयात प्रवेश करून एक किलो वजनाचा चांदीचा मुखवटा पळविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर पुढील तपास करीत आहेत.