ऑनलाईन टीम / श्रीनगर
गेले काही दिवस जम्मु काश्मीरमध्ये पाकपुस्कृत दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. या दशतवाद्यांनी काश्मीरमधील ठरावीक नागरिकांना टार्गेट करत त्यांच्या हत्या सुरु केल्या होत्या. याचबरोबर दहशतवाद्यांनी भारतीय पोलीसदल व सैन्यदलावर ही हल्ले करत त्यांना निशाणा करत त्यांच्यावर हल्ले चढवले आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांनी कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला सर्वप्रथम भेट दिली.तसेच शाह यांनी मृत अधिकारी परवेज अहमद यांच्या पत्नीला सरकारी नोकरीची कागदपत्रे सूपूर्त केली आहे.
काही दिवसांपासुन काश्मीरमध्ये नागरिकांवर हल्ले वाढले असुन. यात मखनलाल बिंद्रू या शिख शिक्षकाचा आणि एका मुस्लीम नागरिकाचाही मृत्यू झालाय. त्यांच्याही कुटुंबाला शाह भेट देणार आहेत. त्यामुळे अमित शाह राजभवनात जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असुन शाह काश्मीरची उच्चस्तरीय बैठक ही घेणार आहेत.