रंगवलेले केस खूप छान दिसतात. पण काही महिलांना केस तात्पुरते रंगवायचे असतात. अशा वेळी पार्लरमध्ये जाऊन वेळ आणि पैसे वाया घालवण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतींनी घरीच केस रंगवता येतील. केस रंगवण्याच्या सोप्या पद्धतींविषयी…
- केस तात्पुरत्या स्वरुपात रंगवण्याचा सहज, सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे हेअर चॉक. केस हायलाईट करायचे असतील किंवा कमी दिवसांसाठी वेगळा रंग हवा असेल तर तुम्ही हेअर चॉक वापरू शकता. केस थोडेसे ओले करून हा चॉक वापरायचा असतो. वेगवेगळ्या रंगांचे हेअर चॉक मिळतात. केस आठ ते दहा वेळा धुतल्यानंतरही हा रंग टिकतो. त्यानंतर मात्र रंग उतरू लागतो. त्यामुळे हेअर चॉक अगदी आरामात वापरता येईल.
- हेअर कलर स्प्रे हा सुद्धा चांगला पर्याय आहे. या स्प्रेचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने केस रंगवता येतात. केसांच्या मुळांपासून शेंडय़ांपर्यंत स्प्रे करता येतो. लग्न किंवा एखाद्या
समारंभासाठी केस रंगवायचे असतील तर हेअर स्प्रे वापरता येईल. - केस कायमस्वरुपी रंगवल्यानंतर तुमचा लूक कसा दिसेल हे जाणून घ्यायचं असेल तर सेमी परमनंट हेअर डाय वापरा. यामुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल. हा रंग अधिक काळ टिकतो. तसंच याचे फारसे दुष्परिणामही नाहीत.
- घातक रसायनांपासून केसांचं रक्षण करायचं असेल तर तुम्ही व्हेजिटेबल डाय वापरू शकता. हा डाय बराच काळ टिकून राहतो. या
डायमुळे केसांचं नुकसान होत नाही. तसंच केस छान चमकदार दिसतात. - हेअर कलर वॅक्स हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. हा वॅक्स हातांवर घेऊन केसांवर लावायचा असतो. यामुळे खूप छान लूक मिळतो. यात विविध रंग उपलब्ध आहेत.