पुणे \ ऑनलाईन टीम
कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.
चंदन ठाकरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मयत राजू सापते यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ प्रसिद्ध करत राजेश साप्ते यांनी युनियनचे पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला होता. लेबर युनियनचे राकेश मौर्य, मिस्त्री नरेश विश्वकर्मा, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे यांचा शोध सुरु आहे.
आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राजेश साप्ते म्हणाले होते की, नमस्कार,….मी राजेश मारुती साप्ते! मी आर्ट डायरेक्टर आहे. मी कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही. मी, पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मोरया लेबर युनियन हे खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलं आहे. माझी कुठलीही कंप्लेन्ट तिकडे नाही. राकेश मोरया युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दामहून फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहेत की, राजू सापते यांनी एक का देड दिया नहीं… हे कालही मी क्लिअर केलं आहे. नरेश मिस्त्री नावाच्या व्यक्तीने पण फोन करून विचारलं असता त्यांनी ही सांगितलं की माझं पेमेंट पूर्ण आहे. नरेश मिस्त्री यांनी सांगितलं की आजपर्यंत दादांनी कुठलंही पेमेंट अर्धवट केलेलं नाही. तरीही राकेश मोरया हे मला खूप सतावत आहेत. ते माझं कोणतंही काम चालू करू देत नाहीत. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. ज्याचं मला, इमिजेट काम सुरू करायच आहे. त्यातला एक प्रोजेक्ट काल मला झीचा सोडून द्यावा लागला. कारण मला ते कामच करू देत नाहीत. दशमी क्रियेशनचं काम चालु असताना ते त्यांनी थांबवलं आहे. या गोष्टींचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा….धन्यवाद!
Previous Articleसांगली : मिरजेतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध
Next Article ओबीसी आरक्षणासाठी साताऱ्यात रासपचे जेलभरो आंदोलन
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.