माजी मंत्री गोविंद गावडे : विद्या भंडारी तिसऱया बक्षिसाच्या मानकरी
प्रतिनिधी /बेळगाव
गेली 25 वर्षे समाजाशी बांधिल राहून आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यही करीत आपला उद्योग कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून पसरून नावलौकीक केला आहे, हे कौतुकास्पद आहे. असाच उपक्रम पुढेही चालू ठेवावा व नागरिकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्यात. तसेच विविध कार्यक्रमाची आखणी करावी, असे प्रतिपादन गोव्याचे माजी सहकार व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केले. दरम्यान रौप्यमहोत्सवी तिसऱया लकी ड्रॉमध्ये विद्या भंडारी या मानकरी ठरल्या आहेत.
उद्यमबाग येथील कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कलाश्री भव्य तिसऱया सोडतीच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर उद्योजक भरत देशपांडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहन जवळी, उद्योजक बसीर सनदी, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे अनिल बाराटक्के व कलाश्री समुहाचे अध्यक्ष प्रकाश डोळेकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत प्रकाश डोळेकर यांनी केले. माजी मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते तिसऱया बंपर ड्रॉ ची सोडत काढण्यात आली. तिसऱया सोडतीच्या बक्षिसाच्या अनगोळच्या विद्या भंडारी या विजेत्या ठरल्या. त्यांना कपाटाचे बक्षिस देण्यात आले. यावेळी पी. वाय. लोहार (राजाराम नगर बेळगाव), माधुरी सावंत बेळगाव, मारूती अलारवाडकर बेळगाव, प्रकाश बेळवडकर उद्यमबाग, दिनेश धामणेकर मजगाव या विजेत्यांना इलेक्ट्रिक शेगडीचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. योजनेच्यावेळी सहभागी सभासदांना 5 किलो साखर केवळ 100 रुपयात देण्यात आली.