प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवारी होणारी मुंबई विद्यापीठाची तृतीय वर्षाची ऑनलाईन परीक्षा तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली आहे. या पेपरचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे प्रसिध्दीपत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केले आह़े
मंगळवारी तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेची परीक्षा होणार होत़ी मात्र यावेळीही पेपरची लिंक विद्यार्थ्यांना नियोजित वेळेमध्ये मिळाली नव्हत़ी दुपारी 1 च्या पेपरची लिंक 2 वाजले तरीही न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होत़े विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा फटका बसल़ा याबद्दल विद्यार्थीवर्गामधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान मंगळवारी रद्द झालेल्या पेपरची तारीख व वेळ नव्याने †िवद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने जारी केले आह़े